दहावीचा पेपर फुटला!

पंढरपूर, 24 मार्चः पंढरपूरमधील जनता विद्यालयात दहावीचा पेपर फुटल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. परीक्षेच्या दिवशी दहावीचा हिंदी विषयाचा पेपर दीड तास आधी फुटल्याची माहिती धक्कादायक माहिती प्रकाश झोतात आली आहे. पेपर फुटी प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अमर कांबळे यांची शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल आहे. विद्यार्थ्यांकडून पैसे घेऊन पेपर दिला जात असल्याचा आरोप अमर कांबळे यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणीही सामाजिक कार्यकर्ते अमर कांबळे यांनी भारतीय नायकशी बोलताना केली आहे.

या पेपर फुटी प्रकरणानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांबाबत बोर्ड कोणती भूमिका घेणार?  दहावीचा हिंदी विषयाचा पेपर होणार का, हिंदी पेपर दिलेल्या विद्यार्थ्यांचं काय होणार, या सगळ्या प्रश्नांची उकल बोर्ड कशी घेणार याकडे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *