तुमचा मोबाईल डेटा लवकर संपतो; मग हे करा उपाय

स्मार्टफोनमधील मोबाईल डेटा खूप लवकर संपतो, अशी ओरड अनेक स्मार्टफोन युजर्सकडून ऐकण्यात येत आहे. काहींजण दररोज १.५ जीबी डेटा देखील पूर्ण वापरत नाही, तर दुसरीकडे काहींसाठी, दररोज ३ जीबी डेटा देखील कमी पडत आहे. यामागील एक कारण हे फोनचे काही अ‍ॅप्स आणि फोन सेटिंग्स असू शकतात. तुम्हाला देखील २-३ जीबी डेटा दररोज पुरत नसेल किंवा तो वेळेच्या आधीच संपून जात असेल तर या काही ट्रिक्स आहेत, ज्या तुम्हाला मदतगार ठरतील. यासाठी तुम्हाला खूप काही करावे लागणार नाही. फक्त तुमच्या स्मार्टफोनमधील काही सेटिंग्समध्ये बदल करावा लागणार आहे. या अशाच ५ सोप्या टिप्स आहेत, ज्या तुम्ही फॉलो करून मोबाईल डेटा वापर मोठ्या प्रमाणात कमी केला जाऊ शकतो.

1)   प्रत्येकाच्याच मोबाईलमध्ये व्हॉट्सअ‍ॅप हे अ‍ॅप असते. हे अ‍ॅप सर्वजण आवर्जून वापरतो आणि त्यावर दिवसभर अनेक फोटोज तर कधी मित्र- मैत्रिणींनी पाठवलेले छोटे-मोठे आणि व्हिडिओज देखील पाहतो. अशात, जर तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये ऑटो डाउनलोड फीचर ओपन असेल, तर हे सर्व फोटो आणि व्हिडिओ आपोआप डाउनलोड होतात. पण, ऑटो डाउनलोड फीचर बंद केल्याने तुमचा बराचसा डेटा वाचू शकतो. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंगमध्ये जाऊन स्टोरेज आणि डेटावर क्लिक करा आणि मीडिया ऑटो डाउनलोडमध्ये जा आणि नो मीडिया निवडा.

2)  स्मार्टफोनमध्ये खूप उत्तम फीचर्स असतात. ज्याप्रमाणे फोनची बॅटरी वाचवण्यासाठी फोनमध्ये बॅटरी सेव्हरची सुविधा उपलब्ध आहे, त्याचप्रमाणे डेटा वाचवण्यासाठीही फोनमध्ये अशीच सुविधा उपलब्ध आहे. त्याला डेटा सेव्हर असे नाव देण्यात आले आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनच्या सेटिंग्जमध्ये जाऊन ते शोधू शकता आणि तेथून ते डेटा सेव्हर अनेबल करू शकता. ही टीप वापरल्याने स्मार्टफोनमधील डेटा वेगाने संपणार नाही. तसेच तुमच्या डेटा पॅकमधील १.५ जीबी डेटा देखील व्यवस्थित पुरेल.

3)  स्मार्टफोन युजर्स किती डेटा उपलब्ध आहे याचा विचार न करता सतत इंटरनेट वापरतात. त्यामुळे अनावश्यक गोष्टींवर देखील डेटा व्यर्थ जातो. डेटा लिमिट सेट करणे हा एक प्रभावी पर्याय ठरू शकतो. तुम्हाला सुद्धा तुमच्या स्मार्टफोनवर डेटा लिमिट सेट करायची असेल तर तुम्ही ते सहज करू शकता. यासाठी अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये ही सुविधा देण्यात आली आहे. त्याच्या मदतीने तुम्ही डेटाची मर्यादा सेट करू शकतो. यासाठी फोनच्या सेटिंगमध्ये जाऊन डेटा लिमिटचा पर्याय शोधा. अनेक फोनमध्ये हे फीचर डेटा युसेज कन्ट्रोल नावानेही येते.

4)  यासह स्मार्टफोन युजर्स अनेक कामं आजकाल ऑनलाईन करतात. त्यामुळे त्यांच्या फोनमध्ये देखील खूप अ‍ॅप्स असतात. हे अ‍ॅप्स तुमच्या वापरण्यात कमी तर येतात. मात्र, डेटाचा वापर देखील खुप करतात. म्हणूनच, तुमच्या स्मार्टफोनमध्ये असलेल्या अ‍ॅप्सपैकी कोणते अ‍ॅप सर्वाधिक डेटा वापरते, याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सेटिंग्जमध्ये जाऊन कोणते मोबाइल अ‍ॅप सर्वाधिक डेटा वापरत आहे, हे तुम्ही तपासू शकता. यासाठी, स्मार्ट फोनच्या सेटिंगमध्ये जा, त्यानंतर वायफाय आणि नेटवर्क आणि डेटा वापरावर जा. येथे तुम्हाला कोणते अ‍ॅप किती डेटा वापरत आहे, याबद्दल सविस्तर माहिती मिळेल.

5)  अनेकांना कदाचित हे माहित नसेल. पण, मोबाइल डेटा लवकर संपण्यामागे ऑटो अपडेट हे देखील एक महत्वाचे कारण असू शकते. गूगल प्ले स्टोअरमुळे देखील तुमचा डेटा लवकर संपू शकतो. तुमच्या फोनमधील डाउनलोड केलेले अ‍ॅप्स वेळोवेळी अपडेट करत राहतात. जे, अधिक डेटा वापरतात. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये अ‍ॅप्सचे ऑटो अपडेट बंद केलेले बरे. यासाठी प्ले स्टोअरवर जाऊन आणि तुमच्या प्रोफाइल आयकॉनवर टॅप करा. त्यानंतर सेटिंग्जवर जा आणि अ‍ॅप डाऊनलोड प्रेफरेन्सेस या पर्यायावर टॅप करा. या नंतर Ask me Every time पर्याय निवडा पर्याय निवडा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *