जय पवारांचा ‘तो’ फोटो झाला व्हायरल

बारामती, 29 मार्चः महाराष्ट्राच्या राजकारणात पवार घरण्याचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते. पवार म्हणजे पावर असंच गणित सध्या राज्यभरात प्रचलित आहे. विकासाच्या राजकारणामुळे पवार घराणे हे नेहमी चर्चेत असते. या पवार घराण्याचे सुपुत्र जय पवार हे वेगळ्याच कारणामुळे सध्या चर्चेत आलेले दिसत आहे.

जय पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र आहेत. जय हे राजकारणात सक्रिय असले तरी प्रत्यक्षात मात्र ते समोर येत कोणतीही राजकीय भूमिका मांडताना दिसत नाहीत. मात्र ते सोशल मीडियाच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय दिसतात. याच सोशल मीडियावर जय पवार यांचा एका फोटो मोठा व्हायरल होताना दिसत आहे. हा फोटो एका बॉलिबूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत आहे.

जय पवार हे त्याचा मित्र आणि ही अभिनेत्री असा तिघांचा फोटो सध्या खूपच व्हायरल होत आहे. ही अभिनेत्री बॉलिवूडची सुपरहॉट अभिनेत्री उर्वशी रौतेला आहे. या फोटोत उर्वशीने स्कीन कलरचा वनपीस घातला आहे. तिच्या शेजारी जय आणि उर्वशीचा कॉमन मित्र आहे आणि या मित्राच्या शेजारी जय उभे आहेत. तिघेही कॅमेऱ्याला पोझ देताना दिसत आहे. उर्वशी आणि जय पवार यांचा हा फोटो ‘cine riser official’ या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आला आहे. हा फोटो दुबईच्या बुर्ज-अल-अरब येथील असल्याचा दावा करण्यात आला आहे. या फोटोची सध्या सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *